Mothers Day Quotes in Marathi – मदर्स डे मराठी शुभेच्छा
Mothers Day Quotes in Marathi


रोज तुला हाक मारल्याशिवाय
माझा एकही दिवस जात नाही..
आईच्या प्रेमाची माय काहीही
केल्या कमी होत नाही.
?मातृदिनाच्या शुभेच्छा ?
आई म्हणजे निस्वार्थी प्रेम
आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा…
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा! ?
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,
खरंच… आई किती वेगळी असते…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! ?
आईसाठी मदर्स डे कोट्स मराठी मध्ये
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!

आई म्हणजे मंदीराचा उंच कळस,
अंगणातील पवीत्र तुळस
भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,
वाळवंटात प्याव अस थंड पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी,
वाळवंटात प्याव अस थंड पाणी,
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी
आणी वेदनेनंतरची सर्वात पहीली आरोळी.
Mothers Day Status In Marathi । मदर्स डे स्टेटस मराठी मध्ये

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
Happy Mothers Day Quotes in Marathi
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही…
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई…
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..
मातृदिनाच्या शुभेच्छा
गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची…
भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची
आई तुझ्या मूर्तीवाणी..
या जगात मूर्ती नाही..
अनमोल जन्म दिला
आई तुझे उपकार
या जन्मात तरी फिटणार नाही

आई तुला किती काय काय सांगायचे असते..
तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते..
पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कितीही चुकीचे वागलो तरी
मोठ्या मनाने माफ करणारी
एकमेव व्यक्ती आहे माझी आई…
तीच माझी सर्वस्व.. तिच माझी मैत्रीण
Mothers day messages in Marathi । मदर्स डे शुभेच्छा मराठी मध्ये

आईची माया शब्दा मांडू शकेल असा कोणीही नाही..
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही कितीही मोठे झालात तरी
आईसाठी तुम्ही कायम लहान असता ..
तिच्यासाठी तुम्ही कायम तिचे बाळ असता..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Mothers day wishes Marathi – मातृ दिन मराठी शुभेच्छा
सगळ्या जगाने तुम्हाला नाकारले तरी
तुम्हाला आहे त्या रुपात प्रेम करणारी
एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे आई..
आई तुला मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!
ना कोणासाठी झुरायचं..
ना कोणासाठी मरायचं..
देवानं आई दिली आहे
तिच्यासाठी कायम जगायचं.
मातृदिनाच्या शुभेच्छा!
माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही…
आणि माझा मोठेपणा सांगतना
तिच्या आनंदाला पारावर उरत नाही..
अशी ही माझी आई
‘आ’ म्हणजे आत्मा…
आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर..
आई तुला तुझ्या खास दिवसाच्या शुभेच्छा!
आकाशाचा जरी केला कागद…
अन् समुद्राची केली शाई…
तरीही आईच्या प्रेमाबद्दल
कधीच काही लिहून होणार नाही
Mothers Day Quotes in Marathi from daughter

Recent Comments